महाराष्ट्रातले मंत्री कमिशनखोर, खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाने खळबळ

महाराष्ट्रातले मंत्री कमिशनखोर, खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाने खळबळ

महाराष्ट्रातले मंत्री काम करण्यासाठी 20 टक्के कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आज खासदार जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.

मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता, त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री हे देखील कामांसाठी कमिशन घेत असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.

Hardik Joshi: राणाने पाठकबाईंला किस केलं अन्…; फोटो व्हायरल…

खासदार जलील म्हणाले, कर्नाटकात जसा भ्रष्टाचार सुरु आहे, अगदी तसाच भ्रष्टाचार महाराष्ट्रातही सुरु आहे. तुम्ही कोणतंही काम घेऊन मंत्रायलायत जा. ज्या त्या खात्याच्या जो कोणी मंत्री असेल, त्याच्या स्वीय सहाय्यकाला मी कमिशन देण्यास तयार असल्याचं सांगताच काम होतं असल्याचा गंभीर खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Karnataka Election Results : भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या लक्ष्मण सवदींचा दणदणीत विजय

तसेच जशा कर्नाटकात निवडणुका झाल्या तशा निवडणुका महाराष्ट्रातही होणार आहे. आता तुम्ही देखील वाट बघा तुमच्याही निवडणुका येणार असून तुम्हालाही जनता दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मंत्र्यांच्या कामांचा 15 ते 20 टक्केवारीचा दर सुरु असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील मंत्र्यांवर कमिशनखोरीचा आरोप करण्यात आल्यानंतर वाद पेटण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube