Karnataka Election Results : भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या लक्ष्मण सवदींचा दणदणीत विजय
Karnataka Election Results : भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी अथणी मतदारसंघातून (Athani Constituency) मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे महेश कुमथल्ली (Mahesh Kumthalli) यांचा सुमारे 76 हजार मतांनी पराभव केला. कर्नाटकच्या अथणी मतदारसंघात मोठी चुरस होती. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
अटीतटीची मानल्या जाणाऱ्या अथणी मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून महेश इराणगौड कुमथल्ली रिंगणात होते. लक्ष्मण सवदी यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारुन दंड थोपटले होते.
Jayant Patil : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली
मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून लक्ष्मण सवदी हे अथणीतू आघाडीवर होते. सवदी हे भाजपचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. तथापि, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कुमथल्ली यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. 2019 ते 2021 या काळात सावेडी हे भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
यावेळी काँग्रेसने लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी दिली होती. अथणीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होती. ही जागा चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. यावेळी भाजपचे इराणगौड कुमथल्ली येथून आमदार होते. त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक जिंकली होती पण 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. यावेळीही कुमथल्ली हे भाजपचे उमेदवार होते.
Karnataka Election : एक दोन नाही तब्बल ‘इतके’ मंत्री बसले घरी; मतदारांचा कौल गेला विरोधात
या जागेवर जेडीएसने शशिकांत पडसलगी आणि आम आदमी पक्षाने संपत कुमार शेट्टी यांना तिकीट दिले होते. याशिवाय केआरपीपीकडून बसवराज भीमप्पा आपले नशीब आजमावत होते. या जागेवर जेडीएस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे.