मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ?

मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ?

Karnataka Election Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election Results) काँग्रेसने जबरदस्त कामगिरी करत भाजपला जोरदार झटका दिला. अनेक मतदारसंघातील निकाल काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. जयनगर मतदारसंघातही काल जोरदार राडा झाला. शेवटी येथे निवडणूक आयोगाने भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना 16 मतांनी विजयी घोषित केले. मतमोजणी सकाळीच सुरू करण्यात आली होती. तरी निकाल मात्र मध्यरात्री जाहीर करण्यात आला. एसएसएमआरव्ही पीयू कॉलेजमध्ये मोठे राजकीय नाट्य घडले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या सर्व फेऱ्या संपल्यानंतर काँग्रेस उमेदवार रेड्डी विजयी झाले होते. नंतर मात्र भाजप नेते खासदार तेजस्वी सूर्या आणि पद्मनाभनगरचे आमदार आर. अशोक यांनी 177 पोस्टल बॅलेट मतांवर आक्षेप घेतला ज्या तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आले होते. गोंधळ सुरू असतानाच जिल्हा निवडणूक अधिकारी तुषार गिरी नाथ तपासणीसाठी मतदान केंद्रात आले.

काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांना 57 हजार 781 तर भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना 57 हजार 797 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक आयोगाने राममूर्ती यांना विजयी घोषित केले.

Karnataka Election Results : काँग्रेसने मुसंडी मारली पण ‘या’ दिग्गज नेत्याच्या भाचीचा दारुण पराभव…

नंतर अनेक अधिकारी आणि नागरिक येथे जमा झाले. अधिकाऱ्यांनी नाकारण्यात आलेल्या 177 पोस्टल मतांची मोजणी केली. त्यानंतर भाजप उमेदवाराला 16 मतांच्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले.या काळात येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तणावही जाणवत होता. काँग्रेसचे दिग्गज नेते डीके शिवकुमार येथे तळ ठोकून होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर या नेत्यांनी बळजबरीने दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आधिकच गोंधळ निर्माण झाला.

कानडी राजकारणातले हुकमी एक्के जारकीहोळी बंधू! सत्ता कोणाचीही असो लाल दिवा फिक्स…

त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन सुरू केले. मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रेड्डी यांनी विजय मिळवला असला तरी फेरमतमोजणीच्या बहाण्याने निकाल फिरविण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांनी केला, असा आरोप यावेळी करण्यात आला. अशोक आणि खासदार तेजस्वी सूर्या यांना बेकायदेशीरपणे मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याच्या निर्णयाचा विरोध करत आम्ही मतमोजणी केंद्राबाहेर आंदोलन केले, असे काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube