Hasan Mushrif यांना दुसरा धक्का ! कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी

कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी मारण्यास सुरवात केली. कागलमधील (Kagal) काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. मागील काही महिन्यात ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर […]

Untitled Design (48)

Hasan Mushrif

कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी मारण्यास सुरवात केली. कागलमधील (Kagal) काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत.

मागील काही महिन्यात ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी देखील बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी करण्यात आली. या ३ ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या मुलीच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावर देखील ही छापेमारी टाकण्यात आली होती.

तर दुसरीकडे याआधी ११ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात मुश्रीफ यांच्याशी संबंधित ४ ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली होती. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील आहेत.

Exit mobile version