Download App

गिरीश महाजन फडणवीसांचे पाय चाटतात; संतापलेल्या खडसेंची बोचरी टीका

महाजन म्हणताय लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी... मी तुमच्यासाखं मुख्यमंत्र्यांच्यचा मागे फिरत नाही, कुठंही लोटांगण घालत नाही -खडसे

  • Written By: Last Updated:

Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहे. महाजन यांनी ट्विटरवर खडसे आणि हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणातील प्रफुल्ल लोढाचा (Praful Lodha) फोटो पोस्ट करत खडसेंना डिवचलं. या फोटोत खडसेंना लोढा गुलाबपुष्प देतांना दिसतो. त्यावर आता खडसेंनी खुसाला केला. तसेच महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

गिरीश महाजन दरवेळेस नाथाभाऊंची ‘ती’ दुखरी नस दाबतात ? 

मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणीसांचे पाय चाटतात, त्यांच्या मागे-पुढं फिरतात, आपण त्यांच्यासाऱखं केलं नाही, त्यामुळंच मला भाजपबाहेर जावं लागल्याचा खुलासा खडसेंनी केला.

खडसे म्हणाले की, तुम्ही जे छायाचित्र व्हायरल केले, त्यामध्ये गाडीत मीच बसलो आहे आणि प्रफुल्ल लोढा हाच रस्त्यात गुलाबाची फुले देऊन माझे स्वागत करत आहे. तसेच, तेव्हा लोढा मला तुमच्या कारनाम्यांची सीडी देणार होता. ज्यामुळं पुढं तुम्ही उघडे पडणार होता, असा दावा खडसेंनी केला. त्या साडीचा धोका ओळखूनच तुम्ही लोढा याची ट्रायडंट हॉटेलमध्येतीन महिने सेवा केला. त्याची मनधरणी केला आणि त्याला पुन्हा पक्षात घेतलं, असं खडसे म्हणाले.

पुढं खडसे म्हणाले, महाजन यांनी माझा जो फोटो ट्वीट केलाय, तो बोलका फोटो नाही. बोलका फोटो ट्विट करा, जे मी केलं ते करा, असं खडसे म्हणाले.

महाजन म्हणताय लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी… मी तुमच्यासाखं मुख्यमंत्र्यांच्यचा मागे फिरत नाही, कुठंही लोटांगण घालत नाही, असं खडसे म्हणाले. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही, असं खडसे म्हणाले.

…तेव्हा राऊत कुठेतरी फुकत बसले असतील; आमदार निलेश राणेंची जळजळीत टीका 

तसेच मी ४० वर्षे रक्ताचं पाणी करून भाजप पक्ष वाढवला आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण, गिरीश महाजन यांच्या वादामुळं मला भाजपातून बाहेर जावं लागल्याचं खडसे म्हणाले.

महाजन यांची पोस्ट  काय?
महाजन यांनी पोस्ट केली. त्यात लिहिलं की, एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय… हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे… २०१९ ते २०२२ च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच… आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय ? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!, असं महाजन म्हणाले.

follow us