Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देतांना तुम्ही ईडी (ED) लावली तर मी सीडी लावेन, असा थेट इशारा दिला होता. त्यानंतर अनेकदा खडसेंनी वेळ आल्यावर सीडी दाखवेन, असं म्हटलं होतं. दरम्यान, खडसेंकडे असलेल्या त्या सीडीमध्ये नेमकं काय होतं? याचा गौप्यस्फोट आता दस्तुरखुद्द खडसेंनी केली.
खडसेंनी एबीपी माझा या वाहिनाला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना तुम्ही वेळ आल्यावर सीडी बाहेर काढणार होता, या सीडीची महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे. सीडी कधीपर्यंत बाहेर येणार असं विचारण्यात आलं. त्यावर खडसे म्हणाले की, त्यांनी ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं होतं. मी यमक जुळण्यासाठी बोललो होतो. पण, माझ्याकडे काही कागदपत्र, व्हिज्युअल होते, असं खडसे म्हणाले.
ते म्हणाले, एका मुलीसोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. मुलीसोबत काय चाळे चालले आहेत, ते बघा, असं वरिष्ठांना सांगितलं. पण, नंतर मला समजले नाही की, मोबाईलमधील क्लिप कशी डिलीट झाली. मी मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो की, माझ्याकडे क्लिप होती. पण, ती कशी डिलीट झाली, मला माहिती नाही. मी भाजपमध्ये असताना भाजपच्या काही वरिष्ठांना ती क्लिप दाखवली होती, त्यांनी ती पाहिली होती, असंही खडसे म्हणाले.
क्लिप देणाऱ्याला मॅनेज केलं…
ती क्लिप कोणत्या स्तरातील नेत्याची होती, असं विचारलं असता खडसेंनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. जे तुम्हाला नावं माहिती आहेत, त्यातीलच एक नावं होतं, असं खडसे म्हणाले. ज्याने मला क्लिप पाठवली होती, त्या व्यक्तीला मॅनेज करण्यात आलं. आज तो माणूस त्यांच्याकडे आहे. त्याला फ्लॅट, पाच कोटी, दहा कोटी, काय दिलंय ते माहीत नाही. पण, आज त्याच्याकडे 20 – 25 कोटींची प्रॉपर्टी असं खडसे म्हणाले.