Eknath Khadase : रावेरमध्ये खडसे विरूद्ध खडसे लढत नाहीच; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने रावेरमध्ये रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) यांना उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याचे बोलला जात होतं मात्र या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम दिला.
Lok Sabha Elections : महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, केवळ 6 जागांची बोलणी बाकी
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, रोहिणी खडसे या मतदारसंघात काम करत आहेत मात्र त्या लोकसभेच्या उमेदवार नाहीत. रावेरची जागा राष्ट्रवादी कडेच आहे तसेच सात-आठ उमेदवार इच्छुक आहेत. त्या उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक झाली. त्यांची माहिती घेण्यात आली. त्यातील एका उमेदवाराची निवड उद्या होण्याची शक्यता आहे. तसेच मी देखील या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही कारण प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी मला तसा सल्ला दिला आहे.
Tanush Kotian : 500 पेक्षा जास्त रन, 29 विकेट्स; टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘अश्विन’
तर रोहिणी खडसे या लोकसभेसाठी इच्छुक नाही तर त्यांनी मुक्ताईनगर विधानसभेसाठी तयारी केली आहे. तसेच यावेळी खडसे यांना विचारण्यात आलं की, जर खडसे कुटुंबातील उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात नसेल तर भाजपसाठी ही निवडणूक सोपी होईल का? यावर बोलताना खडसे म्हणाले की. राष्ट्रवादीचा जो उमेदवार या मतदार संघातून उभा असेल. त्यांच्यात चुरशीचा सामना होईल. तसेच त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय होईल. अशी असा विश्वास यावेळी खडसे यांनी व्यक्त केला.