Tanush Kotian : 500 पेक्षा जास्त रन, 29 विकेट्स; टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘अश्विन’

Tanush Kotian : 500 पेक्षा जास्त रन, 29 विकेट्स; टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘अश्विन’

Who is Tanush Kotian : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या (Ranji Trophy Final) संघाने विदर्भाचा पाडाव करत विजेतेपद (Vidrabha) पटाकवलं. या सामन्यात फिरकी गोलंदाज तनुश कोटियन (Tanush Kotian) चमकला. त्याच्या धारदार गोलंदाजीपुढे विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. फलंदाजीतही त्याने कमाल केली. या सामन्यात तनुशने सात विकेट्स घेतल्या.

तनुशने साधारणपणे नऊ किंवा दहा नंबरवर फलंदाजी केली. शेवटी फलंदाजीला येऊनही या संपूर्ण मालिकेत त्याने 500 पेक्षा जास्त धावा केल्या. मुंबईसाठी (Mumbai) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तनुश दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दहा सामन्यांतील 14 डावात तनुशने 41.83 च्या सरासरीने 502 धावा केल्या. बडोदा संघाविरुद्ध त्याने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद 120 धावा केल्या होत्या.

Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब

मालिकेतील दहा सामन्यांत तनुशने 29 विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याने एकूण 169 ओव्हर्स टाकल्या. त्याने एका सामन्यात 10 विकेट घेण्याचा पराक्रमही तनुशने केला. अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडेकर शतक करून मैदानावर होता. त्यामुळे मुंबईच्या संघावर दडपण आले होते. त्यावेळी तनुशने अक्षयला बाद करत संघाचा विजय निश्चित केला.

दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईचे वर्चस्व राहिले. या सामन्यात मुंबईने 538 धावांचे टार्गेट दिले होते. या आव्हानचा पाठलाग करताना विदर्भाच्या फलंदाजांनी संघर्ष केली. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यानंतर कर्णधार अक्षय वाडकरने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याला हर्ष दुबेने 65 धावा करत चांगली साथ दिली. एक वेळ अशी आली होती की संघाच्या 333 धावा झाल्या होत्या.

यानंतर मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. या गोलंदाजीसमोर विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, तनुश कोटियनने विकेट घेत विदर्भाचा डाव 368 धावांत गुंडाळला. तनुश कोटियने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर तुषार देशपांडे आणि मुशीर खानने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

टीम इंडियातून पत्ता कट, आता ‘रणजी’तही नो एन्ट्री; श्रेयस अय्यरचं ‘बॅडलक’ कायम

follow us
  • fb
  • instagram
  • youtube