Eknath Khadse On Girish Mahajan : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून राहावं. भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी टीका मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी केलं होतं. महाजन यांच्या या टिकेवर आपण भाजपकडे येण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. मात्र शरद पवार यांची साथ सोडण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या नेत्यांनी विचारलं होतं. त्याचबरोबर भाजपकडून थेट ऑफर आल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला.
Subhedar नंतर दिग्पाल लांजेकरांचा आगामी सिनेमा ‘शिवरायांचा छावा’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
एकनाथ खडसे म्हणाले की, मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. त्यामुळे अजित पवार गटासोबत जाण्याचा प्रश्न येतच नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत येण्यासाठी विचारलं होतं. त्याचबरोबर अजितदादा गटात सहभागी होण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनीही संपर्क साधला होता. मला या दोन्ही नेत्यांनी अजितदादा गटात येण्यासाठी बोलावलं होतं, मात्र आपण शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांची(Sharad Pawar) साथ सोडणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
आधी मुलगा आता वडील भाजपमध्ये, शेळके कुटुंब फुटले; बाळासाहेब थोरातांना धक्का
खडसे म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी आणि भाजपात जाण्यासाठी मी उतावळा असल्याचे मंत्री महाजन म्हणतात. मी कधी त्यांच्याकडे आलो हे देखील अजित पवार यांनी जाहीर करावं. उलट अजित पवार यांनीच मला आपल्या गटात सहभागी होण्यासाठी विचारलं. अमोल मिटकरी यांनी देखील विचारणा केली. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांकडूनही भाजपात येण्याचा आग्रह केला जात असल्याचे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे बोलावलं तरी मी त्यांच्याकडे गेलो नाही. आपण भाजपकडे गेलो नाही तर अजितदादांकडे कसं जाईल? असा प्रश्नच यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. आपण सत्तेसाठी कोणाचीही हांजीहांजी करणारा नेता नाही. आपण कुणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकटमोचक, मीच संकटमोचक आहे, असं सांगून पुढे-पुढे करणारा मी नाही. स्वाभिमानाने जगलो, स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.
भाजपकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यासाठी मी उतावीळ असल्याचा गिरीश महाजन यांचा आरोप चुकीचा असल्याचे खडसे यांनी सांगितले. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांनी भाजपात येण्याची ऑफर दिल्याचेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.