Subhedar नंतर दिग्पाल लांजेकरांचा आगामी सिनेमा ‘शिवरायांचा छावा’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

  • Written By: Published:
Digpal Lanjekar New Marathi Movie

Shivrayancha Chhava Announcement: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ची (Subhedar Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा रंगत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास ५ आठवडे झाले आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावत असल्याचे बघायला मिळत आहे. हा शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा असून या सिनेमाला प्रदर्शित एक महिनाही पूर्ण होत नाही, तोपर्यंतच दिग्दर्शकांनी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केल्याचे बघायला मिळत आहे.

नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या सिनेमाचा प्रोमो सोशल मीडियावर (Social media) शेअर करत दिग्दर्शकांनी सिनेमाचं नाव जाहीर केले आहे. तसेच ‘शिवराज अष्टक’तील सहाव्या सिनेमाची घोषणा करत असताना दिग्दर्शकांनी एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)


हा प्रोमो शेअर करत असताना दिग्दर्शकांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “उजळला तेजाने, पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा, शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा, शिवशंभूचा अवतार जणू, अवतरला ‘शिवरायांचा छावा’ छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्य असा सिनेमा ‘शिवरायांचा छावा!’ सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. ‘शिवरायांचा छावा’१६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त सिनेमागृहात!” अशा आशयाची कॅप्शन दिल्याचे बघायला मिळत आहे.

Sasubai Jorat: सासू अन् जावयाच्या धमाल नात्याची गोष्ट उलगडणारा ‘सासूबाई जोरात’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

मल्हार पिक्चर कंपनी आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट सिनेमाचे सादरकर्ते आहेत. तर सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आहेत. तसेच सिनेमाची निर्मिती वैभव भोर आणि किशोर पाटकर यांनी केली आहे. तसेच या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून अद्याप सिनेमाच्या स्टारकास्टची घोषणा करण्यात आली नाही. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ सिनेमा गेल्या २५ ऑगस्ट दिवशी महाराष्ट्रामधील सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच तान्हाजी मालुसरेंची यशोगाथा सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांना बघायला मिळाली आहे. चाहत्यांकडून या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने फक्त ५ आठवड्यात १२.९४ कोटींचा गल्ला कमावला आहे.

Tags

follow us