Sasubai Jorat: सासू अन् जावयाच्या धमाल नात्याची गोष्ट उलगडणारा ‘सासूबाई जोरात’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला 

Sasubai Jorat: सासू अन् जावयाच्या धमाल नात्याची गोष्ट उलगडणारा ‘सासूबाई जोरात’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला 

Sasubai Jorat Marathi Movie: सासू-सुनेचं एक अनोख नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. परंतु सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं (Social media) चित्रण ‘सासूबाई जोरात’ या मराठी सिनेमात लवकरच बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) सिद्धार्थ प्रभाकर ढगे (Directed by Siddharth Prabhakar) यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा मराठी दर्जेदार सिनेमा २९ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

तसेच प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं ‘सासूबाई जोरात’ हा मराठी सिनेमा प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या सिनेमाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली असल्याची माहिती समोर आली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केल्याचे सांगितले जात आहे.

सिनेमात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.’सासुबाई जोरात’ ही गोष्ट आहे, आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची रंजक अशी कहाणी बघायला मिळणार आहे. या सासूला तिच्या नवऱ्याची देखील आजिबात चिंता नाही.

Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral

तसेच ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागत असते. या सासू आणि जावई यांच्यामध्ये काय होतं याची धमाल गोष्ट ‘सासूबाई जोरात’ या सिनेमात मांडण्यात आली आहे. यामुळे सासू- सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर सिनेमा मालिकांतून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट सिनेमात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरणार आहे, यामध्ये काही शंकाच नाही. तसेच सिनेमात एक उत्तम स्टारकास्ट असल्यामुळे हा सिनेमा अभिनयाची मेजवानी असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube