Download App

NCP च्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदे!

  • Written By: Last Updated:

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) विधान विधानपरिषदेमधील प्रतोद आणि गटनेते पद रिक्त झालं होतं. राष्ट्रवादीने विधानपरिषदे गटनेते म्हणून एकनाथ खडसे आणि प्रतोदपती अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली. मात्र, यामध्ये विधिमंडळाकूडन गंभीर चूक झाली. ही चूक राष्ट्रवातीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निदर्शनास आणून दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद गटपनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची नियुक्ती झाल्याच्या पत्रावरून आज विधानसभेत एकच हशा पिकला. विधान परिषदेच्या पत्रातच ही चूक झाली होती. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. हे पत्र मॉर्फ नसून ते वेबसाईटवर असल्याचे सांगत त्यांनी ही गंभीर चूक असल्याचं सांगतिलं. विधानसभेचं कामकाज चालू झाल्यवर पॉंईट ऑफ प्रोसीजरनुसार जयंत पाटील यांनी ही चूक सभागृहाच्या लक्षात आणून दिली.

पेन्शनचे टेन्शन…राज्य सरकारचे 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदासाठी एकनाथ खडसे यांची निवड व्हावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यासंदर्भातील पत्र १० मार्च रोजी काढले गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान मंडळातील प्रतोद आणि गटनेतेपद रिकामे असल्याने त्या जागी विधान परिषद उपसभापतींनी अनुक्रमे अनिकेत तटकरे आणि एकनाथ शिंदे यांची नियु्क्ती केली आहे, असं त्या पत्रात नमूद असल्याचं पाटील यांनी सांगिलेत.

सीएम शिंदे यांनी काल चक्क पंतप्रधानच बदलून टाकले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख त्यांनी पंतप्रधान असा उल्लेख केला होता. त्यामुळे माझे विधिमंडळातील गटनेतेपद धोक्यात आले आहे. नागालॅण्डमध्ये जसं रिओ सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेत आहेत, तसेच एकनाथ शिंदे हे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली.

Tags

follow us