Download App

‘…तेव्हा ते सर्व पक्षीय बैठकीला आले नाहीत’; CM शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा

दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं, लागेल ते करू.Eknath Shinde

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. काल मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) ताफा अडवल्यानंतर आज पवारांनी आपली भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहिलं, असं ते म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shinde) आपली प्रतिक्रिया दिली.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांवर मोठी जबाबदारी, राज्यातील हे अधिकार सोपावले 

दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही सरकारची आणि माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं, लागेल ते करू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. सर्वपक्षीय बैठक बोलवावी या पवारांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, याआधी सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. आम्ही येणार-येणार अस विरोधक म्हणाले. पण, ते आले नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

SaReGaMaPa Lil Champs : सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला 

पुढं ते म्हणाले, राज्यात दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही सरकारची आणि माझी प्रामाणिक भूमिका आहे. पवार साहेबानी जेव्हा माझी भेट घेतली तेव्हा हेच मी त्यांना सांगितलं. आपल्या राज्यात जाती-पातींमध्ये असा संघर्ष कधीच पाहायला भेटला नाही. निवडणुका येतात जातात. सरकारं येतात-जातात. मात्र, मनं दुरावतता. त्यामुळ महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा येऊ नये , राज्यातील वातावरण शांत करण्यासाठी आणि लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं लागेल ते करू, असं शिंदे म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही बोचरी टीका केली. मोगलांच्या घोड्यांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे, तसं मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं णि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालं हे त्यांना अजून हजम झालं नाही. बसता, उठतो, स्वप्नतही मी त्यांना दिसतो. सरकार आज पडेल, उद्या पडेल असं ते सांगायचं. मात्र, आमचं सरकार मजबुतीने उभं आहे. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म का भरतात. पोस्टर्स का लागतात? असा सवाल शिंदेंनी केली.

हे दुटप्पी आहेत. यांना माझ्या लाडक्या बहीण भावाचं काही देणंघेण नाही, त्यांना फक्त घेणं माहित आहे, देणं माहित नाही, अशी टीका सीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

 

follow us