Download App

अखेर एकनाथ शिंदेच्या ‘मुख्यमंत्री’ पदाचे सत्य आले बाहेर, म्हणाले…

मुंबई: राज्यात महासत्तांतविषयी आज देखील राज्यात जनतेच्या मनात अनेक प्रश्न पडले आहेत. बंडखोरी केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटापेक्षा भाजपकडे जास्त संख्याबळ असताना देखील एकनाथ शिंदेंना भाजपने (BJP) मुख्यमंत्रीपद कसं दिलं, असा सवाल जनतेच्या मनात आजही देखील उपस्थित होत असतो. आता याच प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. आपण मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला अगोदरच माहिती होतं का, असा प्रश्न त्यांना विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाकरिता हे सर्व केलेलं नाही. मुख्यमंत्री होण्याकरिता आम्ही हा उठाव केला नाही. २०१९ मध्ये जनतेने भाजप-शिवसेनेच्या युतीला कौल देण्यात आला होता.

भाजपबरोबर सत्ता स्थापन करायला हवी होती. त्याकरिता आम्ही प्रयत्न केला, परंतु, तसं काही झालं नाही. आम्ही खुप प्रयत्न केले. त्याच्यात आम्हाला यश काही मिळालं नाही. पण राज्यात विरोधी विचारांच्या पक्षाबरोबर शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यात आली. महाविकास आघाडीमध्ये आमची वैचारिक कोंडी झालेली, पण कॅबिनेटमध्ये कसे निर्णय होत असायचे, हे अशोक चव्हाणांना विचारा, असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यात नेते एकमेकांविषयी एकदम खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत, त्याचा समाजावर आणि राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांवर काय परिणाम होत असणार, याचा तुम्ही काही विचार केलाय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, हो हे बरोबर आहे, शेवट आपण लोकप्रतिनीधी आहोत. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती सोडून बोलता कामा नये. एक पातळी ठेऊन सर्वांनी बोललं पाहिजे. आम्ही सत्तेत आल्यापासून सर्वातं आधी दहीहंडी आणि सण उत्सवांवर असलेले निर्बंध हटवण्यात आले.

समाजात नकारात्मकता दुर करण्यासाठी या सणांवरील सर्व निर्बंध हटवले. यातून लोकांमध्ये एक सकारात्मकता आली, नुसतं घरामध्ये बसुन चालत नाही. अनेकांच्या तोंडून खालच्या पातळीचे आरोप करण्यात आले, पण माझ्या तोंडून तुम्ही कधी ऐकलं आहे का, असा प्रतिप्रश्न देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, तुम्ही आरोप करत रहा, मी काम करत राहीन, असंच मी त्यांना म्हणत असतो. शेवटी तरुण पिढीसुद्धा आपलं अनुकरण करणार आहे. यामुळे बोलताना प्रत्येकाने काहीतरी जाणीव ठेवली पाहिजे. असे एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हणाले आहे.

Tags

follow us