Eknath Shinde होय मी साक्षीदार आहे… फडणवीस, महाजनांना अटक करण्याच्या कटाचा!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याचा कट आखला जात होता. त्या कटाचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थ संकल्प अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत […]

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath Shinde Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याचा कट आखला जात होता. त्या कटाचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थ संकल्प अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. त्याला प्रत्यूत्तर देत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवरच आरोप केला.

Aaditya Thackeray यांचा शिंदे गटावर हल्ला… आधीचे ‘ईडी’ सरकार आता झाले ‘बीसी’ सरकार!

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माझ्याकडे रोज हजारो फाईली येतात. त्यावर मी मंत्रालय, वर्षा बंगला तसेच कोणत्याही कार्यक्रमात फाईलीवर सही करतोय. तसेच फाईली निकालात काढतो असे सांगत फाईली पाहण्यापलीकडे मला दुसरा काही छंद नाही, असा टोला त्यानी विरोधकांना लगावला.

Exit mobile version