Download App

जे राहिलेत ते पण येतील; साळवींनंतर ठाकरे गटाला आणखी गळतीचे शिंदेंकडून संकेत

Eknath Shinde यांनी ठाकरेंच्या पक्षाला आणखी गळती लागणार असे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पुढील प्रवेश कुणाचा हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde on Udhhav Thackeray and Leaving UBT leaders : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जे राहिले आहेत. ते पण येतील. शिवसेनेत इनकमिंग चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे. असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केला. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे बोलत होते.

Manipur President Rule : मोठी बातमी! मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जेजे नेते शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यांचं शिनसेनेतील नेते स्वागत करत आहेत. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जे राहिले आहेत. ते पण येतील. शिवसेनेत इनकमिंग चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे. तसेच कोकणातील अनेक लोक शिवसेनेत येणार आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या पक्षाला आणखी गळती लागणार आहे असे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पुढील प्रवेश कुणाचा हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सरप्राईज नाव; नेमके कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

तर आजच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. बुधवारी 12 फेब्रुवारीला त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला होता. आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नारााज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यामध्ये आज 13 फेब्रुवारीला दुपारी वाजता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. या पक्षप्रवेशानंतर कोकणात काय समीकरणं बदलू शकतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us