‘बळीराजाची दिवाळी काळी होणार नाही’; मोदींसोबतच्या भेटीत दुष्काळावर चर्चा, शिंदेंनी सांगितलं चर्चेत काय ठरलं?

Eknath Shinde Meet PM Modi On Drought; पंतप्रधानांसोबत अर्धा तास चर्चा ही फक्त महाराष्ट्रातील दुष्काळावर झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde Meet PM Modi On Drought

Eknath Shinde Meet PM Modi On Drought

Eknath Shinde Meet PM Modi On Drought: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या राजकिय कारकिर्दीस 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीत सायकल आणि शिलाई मशीन वाटपाचे आयोजन केले. भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीत झालेल्या भेटीबद्दल एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उल्लेख केला. पंतप्रधानांसोबत जवळपास एक तास चर्चा झाली. त्यातील अर्धा तास चर्चा ही फक्त महाराष्ट्रातील दुष्काळावर झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय पथक राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर; शाहंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

लाडक्या बहिणींना मदतीचा हात देण्याचा मी संकल्प केला

परभणीत बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “महिनाभरापूर्वी परभणीत आलो होतो, तेव्हाही माझ्या लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, आजची परिस्थिती वेगळी आहे. राज्यावर दुष्काळाचं संकट आहे. त्यामुळे बळीराजाच्या मुलींना आणि लाडक्या बहिणींना मदतीचा हात देण्याचा मी संकल्प केला आहे,” असं शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्याला सुमारे एक तास वेळ दिला. या भेटीत जवळपास अर्धा तास महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा झाली. शेतकरी, लाडक्या बहिणी आणि दुष्काळाची परिस्थिती याबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

Rahul Gandhi : मोठी बातमी, राहुल गांधींना पुन्हा पोलिसांनी घतलं ताब्यात

सरकारने शेतकऱ्यांना एकटं सोडलं नाही

“संकट मोठं आहे, मात्र शेतकऱ्यांना सरकारने कधीही एकटं सोडलं नाही. मुख्यमंत्री असतानाही नियम आणि अटी शिथिल करून शेतकऱ्यांना मदत केली. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती पाहिली. अनेक शेतकरी आपल्या व्यथा सांगताना भावूक झाले होते. त्यावेळीही सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास आम्ही दिला,” असं शिंदे यांनी नमूद केलं.

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं

राज्यातील जवळपास 80 टक्के भागातील पिकांचं नुकसान झाल्याचा दावा करत शिंदे यांनी बळीराजा हा देशाचा अन्नदाता असल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, तेव्हाही सरकारने मदत केली आणि यंदाच्या दुष्काळातही शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात आहे, असं शिंदे म्हणाले.

Ajay Baraskar On Manoj Jarange : मनोज जरांगे आता टेंडर योद्धा; अजय बारस्कर भडकले

“बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा शब्द मी माझ्या लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधवांना देतो,” असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Exit mobile version