Eknath Shinde यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल : म्हणाले… ‘त्यांनी’ माझ्याविरुद्ध जिंकण्याची भाषा करू नये!

Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे शहरात मोर्चा काढून ठाणे जिंकून दाखवणार अशी भाषा केली आहे. पण, त्यांना मी एवढंच सांगेन की, तुमच्या जन्म देखील झाला नव्हता. तेव्हापासून मी शाखाप्रमुख होतो. राजकारणात अनेक चढ-उतार मी अनुभवले आहेत. अनेक पदावर काम केले आहे. त्यामुळे ठाण्यात येऊन माझ्याविरोधात लढण्याची भाषा करू नये. तुम्ही सोन्याचा चमचा […]

Aaditya Thakeray Eknath Shinde

Aaditya Thakeray Eknath Shinde

Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे शहरात मोर्चा काढून ठाणे जिंकून दाखवणार अशी भाषा केली आहे. पण, त्यांना मी एवढंच सांगेन की, तुमच्या जन्म देखील झाला नव्हता. तेव्हापासून मी शाखाप्रमुख होतो. राजकारणात अनेक चढ-उतार मी अनुभवले आहेत. अनेक पदावर काम केले आहे. त्यामुळे ठाण्यात येऊन माझ्याविरोधात लढण्याची भाषा करू नये. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे. त्यामुळे तुमची ती ताकद नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे येथे केलेल्या आणि आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे येथील मोर्चात केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Nitin Deshmukh : ओरिजिनल दूध प्यायला असाल तर ठाकरेंना अडवून दाखवा – Letsupp

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोण काय बोलतेय याकडे खरंतर मी लक्ष देण्याची गरज नाही. कारण, जे ठाणे जिंकण्याची भाषा करतात. त्यांना हे माहिती नाही की, त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो. त्यांना राजकारण समजायला बराच वेळ लागणार आहे.

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांनी माझ्याविरोधात लढण्याची भाषा अजिबात करू नये. तुम्हाला काय माहिती खरा शिवसैनिक काय आहे. त्याने शिवसेना मोठी करण्यासाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारू नये. आधी आपलं घरं सांभाळा नाही तर उरलेले लोकं पण तुम्हाला सोडून जातील. एवढं सगळं होऊनही काहीही बोध घेत नाही, आत्मपरीक्षण करत नाही, अशा लोकांच्या आव्हानावर मी काही बोलायची आवश्यकता नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी फटकारले.

Exit mobile version