Eknath Shinde on Uddhav Thackeray : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारमध्ये दलाल बसलेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नांदेड मधील घडलेली घटना दुर्दैवी आहे पण त्यावर राजकारण करणे हे त्यापेक्षा जास्त दुर्दैवी आहे. त्यांनी केलेली मागणी चांगली आहे. कारण कोविड घोटाळ्यात जे काही गैरप्रकार झाले आहेत. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार त्यांच्या काळात झाले आहेत.म्हणून मयताच्या टाळूवरच लोणी खाण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करता येणार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
अजितदादांचं टेन्शन वाढलं! शरद पवार गटाने टाकला डाव; सर्वोच्च न्यायालयात..,
कोविड काळात मृतांच्या बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लॉटमध्ये पैसे खाल्ले ते आता बाहेर येत आहे. त्या प्रकराबद्दलचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशाप्रकारच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची नक्कीच चौकशी होईल. औषधांची चुकीच्या पद्धतीने खरेदी केली असेल तर त्यांची चौकशी केली जाईल. नांदेडच्या प्रकरणाची चौकशी सरकार करत आहे. दोषींना पाठिशी घातले जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? शरद पवार की अजितदादांचं? आज महत्वाची सुनावणी
कोविडमध्ये तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते. त्यांना भेटायचं म्हटले तरी लोकांच्या टेस्ट करत होते, अशा प्रकारचे मुख्यमंत्री सर्व जगाने पाहिले. आम्ही रस्त्यांवर उतरुन पीपीटी किट घालून रुग्णालयात फिरत होते, लोकांच्या भेटी घेत होतो. त्यावेळी हे घरात बसून नोटा मोजण्याचे काम करत होते. त्यांचा खरा चेहरा लोकांनी पाहिला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारा पैसे कुठं जात होते हे बाहेर येईल, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.