अजितदादांचं टेन्शन वाढलं! शरद पवार गटाने टाकला डाव; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…

अजितदादांचं टेन्शन वाढलं! शरद पवार गटाने टाकला डाव; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…

Ncp Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार गटांत(Ajit Pawar) जोरदार संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असतानाच आता शरद पवार गटाने मोठा डाव टाकला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजित पवार गटाला थेट सर्वाच्च न्यायालयाचा रस्ताच दाखवला आहे. अजित पवार गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी द्यावेत, या मागणीची याचिका जयंत पाटील यांनी दाखल केली आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाची येत्या 9 ऑक्टोबरला
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Gadkari: नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘गडकरी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचं हत्यार उपसल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ अजित पवार यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या समर्थकांसह अजित पवार सत्तेत सामिल झाले आहेत. मात्र. , राष्ट्रवादीचा शरद पवार गट अजित पवार गटाच्या या भूमिकेचा विरोध करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाने फक्त सत्तेत सामिल न होता आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? घड्याळ चिन्ह कोणाचं? यावरुन दोन्ही गटामध्ये संघर्ष सुरु आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने शरद पवार आणि अजित पवारांनी नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

न्यूझीलंडसमोर 283 धावांचं लक्ष्य; जो रुटची धुव्वादार बॅटींग

एकीकडे निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरु असतानाच आता जयंत पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. शरद पवार गटाने हा अजित पवार गटावर मोठा डावचं टाकल्याचं दिसून येत आहे. याआधीही अजित पवार गटाच्या आमदारांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटलांनी केली होती. त्यानंतर राहुल नार्वेकरांकडून या मागणीची दखल घेतली नसल्याने जयंत पाटलांनी थेट सर्वोच्च न्यायालयाची वाट धरली आहे.

Harshvardhan Kapoor: ओल्ड ट्रॅफर्ड येथे डेनिस इर्विनसोबत हर्षवर्धन कपूरची अनोखी भेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांबरोबर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल हे गेले आहेत. अजित पवार गटाकडे चाळीस आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला अजित पवारांकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दिसून येत आहेत. तर शरद पवारांकडे तेरा आमदार आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटाने लगेच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आमच्याकडे चाळीस आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्रही निवडणूक आयोगाला सादर केले आहे. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षाचे चिन्ह व पक्ष आम्हाला मिळावा, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube