Download App

गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या अयोध्या दौऱ्यातील फरक’

Eknath Shinde on Ayodhya Tour : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्व सोडलं असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. भाजपसोबत आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वारंवार सांगत असतात. एकनाथ शिंदे यांनी आपली हिंदुत्वाची धार आणखी तेज करण्यासाठी आयोध्या दौरा काढला आहे. यासाठी त्यांनी शिवसेनेतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत घेतले आहे. यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) देखील सहभागी झाले आहेत. दोन विचारधारा वेगवेगळ्या झाल्या होत्या त्या आता एकत्र आल्याने मोठा उत्साह असल्याचे पाटील यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील म्हणाले, अयोध्येत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये जेवढा उत्साह आहे त्यापेक्षा जास्त उत्साह उत्तर प्रदेशातील जनतेमध्ये आहे. 1992 नंतर पहिल्यावेळेस भाजप आणि शिवसेनेचे आमदार, मंत्री आणि कार्यकर्ते एकत्र श्रीरामचे दर्शन घेत आहेत. त्यानंतर दिवसभर एकत्र कार्यक्रम होणार आहेत. पहिल्यावेळेस आलो होतो आणि आता आलोय यामध्ये एक फरक आहे की मधल्या काळात दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या झाल्या होत्या त्या आता एकत्र आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

काळी टोपी, खाकी पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट… नरेंद्र मोदींच्या वेगळ्या लूकची चर्चा

दुपारी रॅली होणार आहे, त्यानंतर दर्शन घेणार आहेत, त्यानंतर मंदिराच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत. रात्री शरयू नदीवर आरतीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा भरगच्च अयोध्या दौरा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घरी येण्याचं निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राम मंदिरात महाआरती करणार आहे. त्यानंतर अयोध्यात होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या कामाची पाहणी करणार आहे. त्यानंतर ते शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार आहे.

Tags

follow us