Chhagan Bhujbal : सांगलीत आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आगामी विधानसभा निवडणुकीत 88 जागांवर उमेदवार उभे करून फक्त 8 उमेदवार जिंकून आणून दाखवा असा चॅलेंज दिला आहे.
ओबीसी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे आपल्या भाषणात पहिली शिवी फडणवीसांना देतो तर दुसरी शिवी मला देतो. जे कुणी त्याच्या बाजूने बोलत नाही त्यांच्या विरोधात हा जातो मात्र आपल्याला सर्वांसाठी काम करायचा आहे. निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढण्याचे काम करू नका असं छगन भुजबळ म्हणाले. आपली एक शक्ती आहे. आपण निवडणूक लढवणार आहोत. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करा असं आवाहन देखील यावेळी भुजबळ यांनी केले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही सर्वांसाठी काम करत आहोत. आरक्षण दिला नाहीतर विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार असं ते म्हणतात, अरे 88 जागा लढवून दाखव आणि त्यातले 8 निवडून आणून दाखव असं थेट चॅलेंज देखील छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना दिले. तसेच ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, सगेसोयऱ्यांना देखील आरक्षण देता येणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं असं असेही यावेळी भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी मी शरद पवारकडे जाणार, मोदी साहेबांकडे जाणार, राहुल गांधींकडे जाणार असं देखील यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
तसेच तुला आरक्षण म्हणजे हे माहिती आहे का? आधी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण का दिलं ? हे समजून घ्या आणि नंतर आरक्षणाची मागणी करा असेही या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले.
‘आजीबाई जोरात’ नाट्याची रसिकांमध्ये क्रेझ, ‘या’ दिवशी पुण्यात होणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग
तसेच राज्यात महायुतीचे सरकार आहे मात्र तरीही ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, पण ओबीसीमधून आरक्षण नाही असं देखील यावेळी छगन भुजबळ म्हणाले.