Elections of Co-operative Societies : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, ही घोषणा होण्यापूर्वीच राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला. सरकारने सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या (Elections of Co-operative Societies) तारखा पुढं ढकलण्यात ढकलल्या. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्यात. यापूर्वीही अनेक कारणे दाखवून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
कोल्हे गटाला पुन्हा धक्का! अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे राष्ट्रवादीत…
राज्यात सध्या 29 हजार 429 निवडणुका सध्या प्रलंबित असून गेल्या काही महिन्यांपासून त्या सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 1 ऑक्टोबरपासून या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक, पतसंस्थांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, राज्य सरकारच्या सहकारी आणि पणन विभागाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ताल, दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सरकारने सोमवारी (ता. 7) आदेश काढून सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करून 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिलेत. विधानसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या.
29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73 मधील तरतुदींनुसार राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेतली जाते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या कार्यालयाकडून 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यात 2024-25 या वर्षात 29,429 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती.
नेमकं कारण काय?
दरम्यान,2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवा अधिग्रहीत केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे सरकारचे मत आहे. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कक मधील तरतुदीनुसार राज्य विधानसभा निवडणुकीसह सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.