डंके की चोट पे! निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच वरळी मतदारसंघ चर्चेत; सदावर्तेंचा थेट ठाकरे बंधूंशी पंगा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या लगबगीला जोर आला असून, आजच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्या पक्षाचे प्रचार गीत लाँच केले असून, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात आता आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Satavarte) यांनी विधानसभेत्या निवडणुकीत उडी घेत थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी थेट पंगा घेतला आहे. (Advocate Gunaratana Satavarte Interested For VidhanSabha)
समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य महाराजांना’ कायद्याचा डोस…
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे जर, महातुतीकडून सदावर्तेंना तिकीट दिले गेले तर, त्यांची थेट लढत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना टफ फाईट देणार आहे. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध वरळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेपूर्वीच वारं फिरलं! अमित शाहंच्या गोटातील खास माणूस पवारांनी फोडला
नुकतेच राज ठाकरेंनी वरळीच्या सभेत मनसे नेते संदीप देशपांडे यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील वरळीतून विधानसभा लढू शकतात, असंही बोललं जात आहे. त्यामुळे सदावर्तेंनी वरळीच्या मैदानात उतरत थेट दोन्ही ठाकरेंशी पंगा घेतल्याचे बोलले जात असून, महायुतीकडून सदावर्तेंना तिकीट दिले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Video : असुरांचा संहार कराया मशाल हाती दे; अराजकीय गाण्यासह ठाकरे विधानसभेच्या मैदानात
2019 ला आदित्य ठाकरेंचा विजय
वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 89248 मतं मिळवत आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्या ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यात आता वरळी विधानसभेतून गुणरत्न सदावर्तेंनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.