गुणरत्न सदावर्तें पुन्हा चर्चेत, ‘त्या’ प्रकरणात थेट राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार

  • Written By: Published:
गुणरत्न सदावर्तें पुन्हा चर्चेत, ‘त्या’ प्रकरणात थेट राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार

Gunratna Sadavarte On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्तें (Gunratna Sadavarte) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पाकव्याप्त काश्मिरला पाठींबा देणाऱ्या एका महिलेशी भेट घेतल्याचा आरोप करत अॅड. गुणरत्न सदावर्ते काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईतील एन.एम.जोशी (N.M.Joshi) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तसेच या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे.  तसेच राहुल गांधी संविधानाच्या विरोधात बोलतो, देशाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी राहुल गांधींवर टीका केली.

अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी रेबर्न हाऊस येथे अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतली यावेळी इल्हान उमरही उपस्थित होत्या. इल्हान उमर पाकव्याप्त काश्मिरला पाकिस्तानचा भाग मानते त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतल्याने भाजपकडून (BJP) राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राहुल गांधी यांनी भारताच्या अविभाज्य भाग असलेल्या अखंड काश्मिर प्रश्नावर इल्हाना उमरची भेट घेतली. इल्हाना उमरचे जैश ए मोहम्मद, लष्करे तोयबा अशा अतिरेकी संघटनांशी संबंध आहे.

Punit Balan : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती जया किशोरी यांच्या हस्ते

ती पाकव्याप्त काश्मीर म्हणते आणि राहुल गांधी अशा महिलेशी परदेशात जाऊन भेटतात. त्या महिलेशी यांचे काय संबंध आहेत. तिच्याशी भेटतो, चर्चा करतो आणि देशाच्या हिताच्या विरोधात भाष्य करतो अशी टीका राहुल गांधी यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube