गुणरत्न सदावर्तेंच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा; भगवान बाबा गडावरही नतमस्तक

गुणरत्न सदावर्तेंच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा; भगवान बाबा गडावरही नतमस्तक

Gunrata Sadavarte : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) संरक्षणासाठी न्यायालयात कायदेशीर बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunrata Sadavarte) आज अहमदनगर दौऱ्यावर होते. गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पाथर्डी तालुक्यात ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड.सदावर्ते यांनी श्री क्षेत्र भगवान गडावर श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं.

Video : ओम बिर्लांना शुभेच्छा देताना तटकरेंनी गाजवली लोकसभा; शाहंसह राजनाथही ऐकत राहिले

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाच हत्यार उपसताच दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाचा पवित्रा घेतल्याचं दिसून आलं होतं. याच वादात, ओबीसींचे न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतल्याचं दिसून आलं होतं.

राज्याचं पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचं ठरणार; उद्धव ठाकरेंची तिखट टीका

गुणरत्न सदावर्ते यांनी ओबीसी आरक्षण आणि मराठा आंदोलनावर परखडपणे भाष्य करीत आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले, मनोज जरांगे यांची मागणी अंसविधानिक असून त्यांनी मर्यादेत बोललं पाहिजे. इतरांनी आंदोलन करावं की नाही याचे धडे त्यांनी शिकवू नये जरांगे कुठला मालक आहे का? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत जरांगे यांना चांगलच धारेवर धरल्याचं दिसून आलं.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी समाज आमने-सामने दिसत आहेत. सामाजिक सलोखा फक्त जरांगे बिघडवत आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला होता. आम्ही संविधानाच्या भाषेत लढाई लढतो, जरांगे अत्याचाराची ताकत वापरून बोलतात. आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नसल्याचं सदावर्तेंनी यांनी जरांगेंना ठणकावून सांगितलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज