Video : ओम बिर्लांना शुभेच्छा देताना तटकरेंनी गाजवली लोकसभा; शाहंसह राजनाथही ऐकत राहिले

Video : ओम बिर्लांना शुभेच्छा देताना तटकरेंनी गाजवली लोकसभा; शाहंसह राजनाथही ऐकत राहिले

Sunil Tatkare News : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) निकालानंतर देशात एनडीएची सत्ता स्थापन झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलीयं. लोकसभेच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची आवाजवी मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. ओम बिर्ला (Om Birla) यांच्या निवडीनंतर देशभरातील खासदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी खास शैलीत शुभेच्छा देत लोकसभा गाजवल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे सुनिल तटकरे शुभेच्छा देत असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह ऐकतच राहिल्याचे दिसून आले.

लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून केरळछ्या मावेलीकारा मतदारसंघातून सलग 8 वेळा खासदार असलेल्या कोडीकुन्नील सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभेत आज आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीयं.

लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून केरळछ्या मावेलीकारा मतदारसंघातून सलग 8 वेळा खासदार असलेल्या कोडीकुन्नील सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभेत आज आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीयं.

ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर सुनिल तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस ओरिज्नल पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार पक्षाकडून ओम बिर्ला यांचं निवडीबद्दल अभिनंदन… असं तटकरे म्हणाले आहेत. यावेळी ओरिज्नल राष्ट्रवादी असा उल्लेख करताच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं होतं. मात्र, काही वेळातच सुनिल तटकरे यांनी आपलं भाषण सुरुच ठेवल्याने गोंधळ शांत झाल्याचं पाहायला मिळालं.

Sai Tamhankar: वाढदिवशी सईने चाहत्यांना दिला धक्का; अभिनेत्री झाली ‘बिझनेस वुमन’, पाहा फोटो

सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले?
देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. आज आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की, 65 वर्षांच्या कालावधीनंतर देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं, याचा आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे. लोकसभेचे अध्यक्ष होण्याचा मान सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांना मिळाला. त्याबद्दल मनापासून अभिनंदन… मी रायगडचा खासदार आहे, आणि माझ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे 13 वे वंशज बसले आहेत, ही आजची लोकसभा साक्ष देते याचा मला अभिमान. गेली पाच वर्षे विरोधी बाकावर बसून न्याय दिलात आता इथे बसून न्याय मिळेल हीच अपेक्षा असल्याचं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा…
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यामार्फत आम्हाला आणि महाराष्ट्राला संसदेत आवाज उठवण्याची संधी मिळेल, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणीही सुनिल तटकरे यांनी यावेळी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज