Sai Tamhankar: वाढदिवशी सईने चाहत्यांना दिला धक्का; अभिनेत्री झाली ‘बिझनेस वुमन’, पाहा फोटो

- काही दिवसापासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट टाकत होती यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची झलक प्रेक्षकांना मिळाली होती आणि आज सईने वाढदिवसानिमित्त स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
- 2024 वर्ष सई साठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि धमाकेदार काम करून सई चर्चेत असते आणि आता तिची एक खास गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते ही गोष्ट नक्की काय ? या मागची गोष्ट काय हे सगळं सई सांगतेय !
- या ब्रँड बद्दल म्हणताना बोलते ” ब्रँड लाँच करण ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण फॅन्स च्या मनात नुसत राहायच नाही तर उरायचं आहे आणि हे मी या निमित्ताने करू शकते म्हणून कायम आपल्या फॅन्स सोबत मनापासून जोडले जाऊ आणि या ब्रँड मुळे त्यांचा मनात राहू ही या मागची संकल्पना होती आणि म्हणून हा ब्रँड लाँच होतोय.
- हा फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या फॅन्ससाठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने तो लाँच करण यासारखा दुसरा मुहूर्त नाही म्हणून फॅन्ससाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे.
- या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील यात शंका नाही आणि मी उद्योजिका फक्त पेपर वर झाली पण मानसिकरित्या ते काही पटत नाही तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल आणि असच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे.
- . 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी असली तरी आता सई हा ब्रँड किती नावीन्यपण प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणार हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय.