कोल्हापूर : ‘ज्या ब्रिक्स कंपनीचा उल्लेख माझ्यावर आरोप करण्यासाठी होतोय तीच्याशी माझा संबंध नाही. तर आप्पासाहेब नलावडे हा करखाना शासनाच्या नियमाप्रमाणे या ब्रिक्स कंपनीला भाडे करारावर चालवायला दिला होता. पण दोन वर्षांपूर्वी ही कंपनी कारखाना सोडून गेली. या कारखान्यावर आता नियमाप्रमाणे संचालक मंडळ आहे. तर माझ्या जावायाचा याच्याशी काही संबंध नाही.’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिलं.
‘हे कशासाठी केलं जातय याचा मला अंदाज नाही मात्र यामुळे माझ्या कुटुंबीयांना नाहक त्रास होतोय. मुलीच्या घरी छापा टाकला तिच्या सासूला त्रास झाला. माझ्याही घरात सुना- नातवंड आहेत. वातावरण भयभीत करायचं हे योग्य नाही. कारवाई आमच्यावर करा, मुला-बाळांना नाहक त्रास देऊ नका.’ असं म्हणत यावेळी ईडीने छाप्यानंतर हसन मुश्रीफ भावूक झाल्याचं दिसून आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि मुलींच्या घरावर सरसेनापती संताजी घोरपडे या माझ्या मुलांच्या कारखान्यावर आणि पुण्यातील काही लोकांच्या घरावर घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकलाय. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही होते. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते.
‘आज सकाळी माझ्या आणि माझ्या मुलींच्या घरावर सरसेनापती संताजी घोरपडे या माझ्या मुलांच्या कारखान्यावर आणि पुण्यातील काही लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहे. या संदर्भात ईडीची कोणतीही नोटीस नाही, समन्स नाही आणि या कारखान्याशी माझा काही संबंध नाही. चार वर्षापूर्वी या कारखान्याची आणि आमची सर्वांची चौकशी झाली होती.’
‘त्यानंतर दिड वर्षांपूर्वी किरीट सोमय्यांनी काही पत्रकार परिषदा घेऊन माझ्यावर आरोप केले होते. त्यावर मी तीन पत्रकार परिषदा घेऊन दिले होते. मी कारखान्याचा संचालक नाही आणि मी कोणत्याही शेअर कंपन्यांच्या मार्फत कारखान्याला पैसा दिलेला नाही. हा पैसा सर्व शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खोटे आहेत.’