मुंबई : ‘ट्रोल होण्याची तर मला सवय झालीय. मी देवाचं भजन जरी म्हटलं तरी ट्रोल होते. पण ट्रोलर्सना धन्यवाद त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझी आतली शक्ती जागी झाली आहे. त्यामुळे ट्रोलिंग मला फरक नाही पडत. उलट उर्जा येते की, मी आणखी चांगलं करावं. तर माझ्या गाण्याला लोकांनी सपोर्ट केला आहे. त्याचंच हे फळ आहे.’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी दिली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
त्याचबरोबर यावेळी त्यांनी अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता सध्या उर्फी व भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यात वाद पेटला आहे. यावर देखील प्रतिक्रिया दिली.
‘चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे की, काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते ठीक नाहीये. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं.’
‘याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने जिथे फ्रोफेशनली कमेंटमेंट नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर… उर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही.’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या.