Download App

सत्तासंघर्षावर संजय राऊत म्हणतात… सर्व प्रेमाने होईल

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हॅलेंटाइन डेपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयातलं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेल्यास हे प्रकरण लांबण्याचीही शक्यता होतीच. पण आता 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

त्यामुळे आता कोणाचा व्हॅलेंन्टाईन डे खास होणार शिंदे गटाचा की, ठाकरे गटाचा. कारण सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्षाच्या या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात येऊन सहा महिने झाले तरी या प्रकरणामध्ये अद्याप एकही निर्णय किंवा आदेश झालेला नाही. फक्त घटनापीठ बदलत आले आहेत. त्यामुळे आज काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शिंदे गटाकडून याच निकालाचा आधार घेत, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेविषयी कारवाईचा अधिकार नाही असं सांगतोय, पण अरुणाचल आणि महाराष्ट्राच्या प्रकरणातील संदर्भ, परिमाणं ही वेगळी आहेत, त्यामुळं या निकालाचा सरधोपट अर्थ न काढता अधिक विश्लेषण करुन निकाला द्यावा अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

Tags

follow us