Download App

Devendrs Fadanvis : निर्णय कर्नाटकात, वाद महाराष्ट्रात; फडणवीसांनी टाकली ‘मविआ’ त काडी

Devendrs Fadanvis : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ( Fadanvis Criticizes Congress and Thackrey on Karnataka Remove Savarkars Lesson from Text books )

अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तर माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची खुली ऑफर

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पाठ्यपुस्तकांमधून हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, पाठ्यपुस्तकांमधून एखादा धडा तुम्ही काढू शकता. पण लोकांच्या मनातील सावरकर आणि हेडगेवार तुम्ही काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वातंत्र्या सेनानी लोकांच्या मनातून काढू शकत नाही.

Khupte Tithe Gupte: ‘माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन’; राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

परंतु कॉंग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा काही वेगळं आपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकाचं लांगूलचालन करण्यासाठी कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार निर्णय घेत आहे. त्यावर माझा महाविकास आघाडीला सवाल आहे. तुम्ही राज्यात कर्नाटक पॅटर्न आणणार असल्याचं म्हणत आहात हाच का तो कर्नाटक पॅटर्न?

त्याचबरोबर माझा सवाल उद्धव ठाकरे यांना देखील आहे की, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण ज्यांच्या मांडिला- मांडी लावून तुम्ही बसलात त्यांनी जर अशा प्रकारे स्वातंत्र्यावीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत. त्यावर तुमचं मत काय? हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सत्तेसाठी तुम्ही हा समझोता केला हे यातून स्पष्ट होत आहे. पण अशा प्रकारे कोणतेही निर्णय घेतले तरी ते कुणाचंही नाव जनतेच्या मानस पटलावरून पुसू शकणार नाहीत.

Tags

follow us