Khupte Tithe Gupte: ‘माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन’; राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Khupte Tithe Gupte: ‘माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन’; राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Khupte Tithe Gupte: गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte)चा खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात तिसऱ्या सीझनमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एंट्री हिवणार असल्याचे सांगितले जात आहे. हा तिसरा सीझन (Third Season) खूप चर्चेत येणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत श्रेयस तळपदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


या शोमध्ये त्यांनी अनेक प्रकारचे खुलासे केले आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता आगामी भागामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हजेरी लावली आहे. या भागाचे काही प्रोमो देखील रिलीज करण्यात आले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहेत.

अवधूत गुप्ते याने इंस्टाग्रामवर ‘खुपते तिथे गुप्ते’चा प्रोमो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन देखील लिहिले आहे की, नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला सल्ला, “सोनं जेव्हा जळतं, तेव्हा जास्त उजळतं”. नक्की बघायला मिळणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ १८ जून, रविवार, रात्री ९ वाजता. या व्हिडीओमध्ये बघायला मिळणार आहे.

तसेच नारायण राणे अवधूत गुप्तेला सांगत आहेत की, सकाळी ४ वाजता माझ्याबरोबर एक रवी नावाचा मित्र होता. तो मला उठवायला लागला, म्हणाला तुझं घर जळत आहे, आणि ते टीव्हीवर दिसत आहे. तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला. ते म्हणाले, नारायण मी बघतोय तुझं घर जळतंय, पण लक्षात ठेव सोनं जेव्हा जळतं, तेव्हा ते जास्त उजळतं. नारायण राणे यांनी त्यांच्या आयुष्यातला एक भावुक असा प्रसंग त्यांनी यावेळी सांगितला आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

२००३-०४ चे आहे हे प्रकरण आहे. छगन भुजबळ गृहमंत्री होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सत्यविजय भिसे यांची रात्री अमानुष हत्या करण्यात आली होती. यानंतर सकाळी कणवकवलीतील वातावरण तापले होते. राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्ते मुंबई-गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात जमले होते. कणवलीतील राणे समर्थकांची दुकाने फोडली होती. पेट्रोल पंप फोडला होता. यानंतर या जमावाने रेल्वे स्टेशनजवळ नारायण राणेंच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळविला होता. तिथे त्यांच्या बंगल्याची तोडफोड करून बंगला जाळला देखील होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube