Download App

मराठा समाजाच्या रोषणामुळे बीडची प्रचारसभा टाळली का ? फडणवीसांनी दिलं उत्तर

देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

Image Credit: letsupp

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेली महिनाभरापासून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. हा प्रचार 18 मे पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होतं आहे. (Maratha Reservation) महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सुरू आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मतदारसंघात सभा घेतल्या. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघात सभा घेण्यासाठी आले नाहीत. त्यांना आपण बीडला सभेसाठी गेला नाहीत असा प्रश्न एका वृत्तवाहीनीवर विचारला असता फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलं. मात्र, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांचा विरोध हे पाहता फडणवीस बीडला गेले नाहीत अशी चर्चा सर्वत्र आहे.

 

विष देण्याचा प्रयत्न

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सगे सोयऱ्यांच्या अमलबजावणीसह आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे. मनोज जरांगे यांनी या मागणीसाठी आंदोलनही केलं आहे. तसंच, मराठा आरक्षणाची जरांगे यांनी भूमिका मांडत असताना वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. तसंच, जरांगे यांनी वयक्तिक फडणवीस यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांकडून विष देण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोपही जरांगे यांनी केला

 

त्याच दिवशी मोदींची सभा 

“मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 मतदारसंघांमध्ये मी प्रचारसभा घेतली आहे. फक्त बीड लोकसभा निवडणुकीला मी जाऊ शकलो नाही मला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सभेला जायचं होतं. नरेंद्र मोदींच्या दोन सभा त्यादिवशी होत्या. त्यातल्या एका सभेला मला जायचं होतं त्यामुळे मी बीडला जाऊ शकलो नाही. मराठवाड्यातल्या बीड वगळता इतर मतदारसंघांमध्ये मी तीन ते चार सभा घेतल्या ” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

म्हणून बीडला जाण टाळलं 

मराठवाड्यात 8 पैकी 7 मतदारसंघात मी सभा घेतल्या मात्र मोदींची सभा असल्याने मला जाता आलं नाही असं कारण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असलं तरी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून फडणवीस यांना केलेलं लक्ष आणि मराठा समाजात मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल असलेला रोष हे पाहता फडणवीस यांनी बीडला जाण टाळलं असं सर्वत्र म्हणत आहेत.

follow us

वेब स्टोरीज