Maratha Reservation : मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. आता मराठा समाज आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत असल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले. यासाठी ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथेही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मात्र दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
मराठा समाजाच्या आरणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत मात्र जोरदार वाद झाले. काही जणांनी एकमेकांवर हल्ला केला. दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकामेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज
या बैठकीद्वारे सामान्य मराठा व्यक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आहोत. या सगळ्यांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हवी होती. पण बैठक घेण्यावरूनच इथे वाद झाले. दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं सांगितलं की आम्ही अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी लढत आहोत. तरीही यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलावलं नाही. काही जण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन पैसे घेऊन येथे आले होते. कार्यकर्त्यांना बैठकीचा कोणताही निरोप मिळाला नाही. हे काही ठराविक लोक समाजाचे मालक झाले आहेत का, असा सवाल या कार्यकर्त्याने विचारला.