Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

Shivsena Advertisement : कालच्या जाहिरातीवरुन शेकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसमोर नमल्याचं दिसून येत आहे. कालच्या जाहिरातीत दुरुस्ती करुन आज पुन्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचा शिंदे-फडणवीसांना आशिर्वाद असल्याचं दाखवलंय. ‘इजा कानाला नाही तर’…; रोहित पवारांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी काल सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित केलेल्या जाहिरातीत ‘देशात मोदी तर राज्यात शिंदे’ अशी टॅगलाईन दिली होती. एवढंच नाहीतर […]

Shivsena Advertisment Today

Shivsena Advertisment Today

Shivsena Advertisement : कालच्या जाहिरातीवरुन शेकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसमोर नमल्याचं दिसून येत आहे. कालच्या जाहिरातीत दुरुस्ती करुन आज पुन्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचा शिंदे-फडणवीसांना आशिर्वाद असल्याचं दाखवलंय.

‘इजा कानाला नाही तर’…; रोहित पवारांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी

काल सर्वच वर्तमानपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित केलेल्या जाहिरातीत ‘देशात मोदी तर राज्यात शिंदे’ अशी टॅगलाईन दिली होती. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीसांना 23.2 टक्के जनतेने कौल दिल्याचं दिल्याचं दर्शवण्यात आलं होतं. त्यामुळे या जाहिरातीने सर्वांचच लक्ष वेधून होतं.

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपमध्ये एक प्रकारचा नाराजीचा सूर असल्याचं दिसून आलं तर विरोधकांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडलं नसल्याचं दिसून आलं होतं. एकंदरीत जाहिरातीमुळे चांगलचं शेकल्यानंतर कालच्या जाहितीतील चूक दुरुस्त करीत आज शिवसेनेने दुसरी जाहिरात प्रसिद्ध केलीय.

‘शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आता भाजपलाही’.. राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप

आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही महाराष्ट्राच्या जनतेचे आशिर्वाद असल्याचा संदेश देण्यात आला आहे. राज्यातल्या जनेतची भाजप-शिवसेना युतीला साथ असल्याचं शीर्षक देण्यात आलं असून राज्यातील 49. 3 टक्के जनेतचा शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाला आशिर्वाद असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच विरोधकांच्या टक्केवारीचाही जाहिरातीत उल्लेख करुन विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यात आलंय. राज्यात प्रमुख विरोधक 26.8 टक्के असून इतर 23.9 टक्के असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Wrestling Federation Election : अनुराग ठाकूर यांनी दिलेला शब्द पाळला, येत्या 4 जुलैला कुस्ती संघटनेची निवडणूक

यासोबतच जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. कालच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचेच फोटो छापण्यात आले होते. त्यावरुन बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करता अन् बाळासाहेबांचा फोटो टाकण्याचा विसरता, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

दरम्यान, कालच्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. मात्र, अचानक फडणवीसांनी दौरा रद्द केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा रंगली. त्यावरुन शिंदे यांनी कार्यक्रमात फडणवीसांबद्दल गौरवोद्गार काढले, अन् आज दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. आज प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरुन मुख्यमंत्री शिंदें भाजपसमोर नमले असल्याचं दिसत आहे.

Exit mobile version