Wrestling Federation Election : अनुराग ठाकूर यांनी दिलेला शब्द पाळला, येत्या 4 जुलैला कुस्ती संघटनेची निवडणूक

Wrestling Federation Election : अनुराग ठाकूर यांनी दिलेला शब्द पाळला, येत्या 4 जुलैला कुस्ती संघटनेची निवडणूक

राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यानंतर आता कुस्ती संघनटेच्या निवडणुकीचं बिगुलं वाजलं आहे. येत्या 4 जुलै रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक होणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिलीय. या निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणूक अधिकारीपदी निवड करण्यात आलीय. (Anurag Thakur kept his word to the protesters, wrestling federation of india election 4th july)

भारताचा 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विघ्नेश फोगट यांनी केला. सिंह यांच्यावर कारवाई होण्यासाठी कुस्तीपटूंकडून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला. या आंदोलनाला देशभरातील विविध स्तरातून आंदोलकांना पाठिंबा मिळत होता. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीही आंदोलनकांना पाठिंबा देत केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला होता.

कर प्रणालीवर अश्नीर ग्रोवरचे मोठे विधान, सोशल मीडियावर खळबळ

अखेर या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकून यांनी कुस्तीपटूंची 7 जूनला भेट घेतली. बैठकीनंतर कुस्ती संघटनेसाठी 30 जूनपर्यंत निवडणूका घेण्यात येणार असल्याच आश्वासन त्यांनी दिलं होतं, मात्र, विशेष सर्वसाधारण बैठक बोलाविण्यासाठी २१ दिवसांची नोटीस द्यावी लागते. त्यामुळे ही निवडणूक ३० जूनऐवजी चार जुलैला होणार आहे.

यासोबतच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित एकाही व्यक्तीला राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात नसल्याचं आश्वासन मंत्री अनुराग ठाकून यांनी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना दिलं होतं. त्यानुसार आता येत्या 4 जुलै रोजी भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक पार पडणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube