लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे येईल; मुख्यमंत्र्यांचा शब्द अन् जय पवारांना विश्वास

Finance Department आपल्याकडे येईल तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दिल्याचं जय पवार यांनी सांगितलं. तसेच विश्वासही व्यक्त केला.

Finance Department

Finance Department

Finance Department handed over to us soon Chief Minister given promise Jay Pawar is confident : अर्थखातं हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होतं. मात्र त्यांच्या निधनानंतर हे खातं फडणवीसांकडे गेलं. कारण सुनेत्रा पवार जरी लगेचच उपमुख्यमंत्री पदावर आल्या होत्या पण त्यांना लगेचच अर्थखातं देणं आणि त्यांनी अर्थसंकल्प सादर करणं देखील शक्य नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी त्या अधिवेशनाला ते अर्थखातं ते त्यांच्याकडे ठेवलं.

वाकड-ताथवडेमध्ये लाखो लिटर पाण्याच्या टाक्या पण पाणीच नाही, फडणवीसच प्रकल्पाला न्याय देणार कलाटेंना विश्वास

मात्र आता हे खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे यावं अशी आपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि सुनेत्रा पवार याचे पुत्र जय पवार यांनी लवकरात लवकर आपलं अर्थखाते आपल्याकडे येईल. असं म्हणत तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दिल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी तसा विश्वासही व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले जय पवार?

सगळे म्हणत आहेत की, आपलं अर्थखातं आपल्याकडे अजून नाही आलं. म्हणून काही-काही ठिकाणी आपली विकास कामं थांबलीत,पण असं नाही.दादा आपल्याला सोडून गेले तेव्हाच अर्थ संकल्प तोंडावर आलेला होता,म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी ठरवलं की त्या अधिवेशनाला ते अर्थखातं ते त्यांच्याकडे ठेवतील. आता काही दिवसांपूर्वी पार्थ दादा वहिनीसाहेब यांची मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली. त्यात मुख्यमंत्री साहेब म्हणालेत की, लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे येईल आणि दादांच्या स्वप्नातील विकास कामं आपण पूर्ण करू.

Exit mobile version