Download App

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी झाला गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

मुंबई : आपल्या आक्रमक व परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नुकतेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष चिन्ह व नाव हे एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असताना आता ठाकरे गटाचे अत्यंत जवळचे नेते असलेले खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नेमका वाद आहेत तरी काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं.

Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच; सलग सुनावणी होणार

यावर राऊतांचं उत्तर…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.

Tags

follow us