Download App

आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा,मग दादा,आबांना प्रवेश द्या

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी)
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पाडणार, ते भाजपत जाणार अशा चर्चा थांबतां थांबत नाही. रोज नवा विषय नवीन कारणावरून अजित पवार यांच्या विषयी चर्चा सुरूच आहे. अजित पवार काय करणार याची पक्षाला जेवढी चिंता नसेल त्यापेक्षा चिंता भाजप च्या पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्याना लागली आहे. विषयही तसाच आहे.

गेल्या अनेक दिवसापासून राज्यपाल यांच्या कोट्याच्या 12 जागांचा विषय प्रलंबित आहे. या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात हा विषय निर्णयाला येऊ शकतो अशी स्थिती आहे. राज्यपाल यांच्या 12 जंगासाठी भाजपा ची दावेदारी होती. नंतर ती महाविकास आघाडीची झाली. सरकार बदललं पुन्हा भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 12 जागांवर भाजपाच्या जवळपास सत्तर जणांनी दावेदारी सांगितली आहे. मागणी साठी अर्ज देखील आले आहेत. त्यातच या जागांमध्ये शिंदे गटाचा देखील हिस्सा अपेक्षीय आहे. भाजपा आठं शिंदे गट चार अस जागांचे वाटप अशी चर्चा भाजप गटात सुरु झाली आहे.

विजयानंतर दामलेंचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल शरद पवारांच्या भेटीला!

आता या आठ जागा मिळाल्या तर यात अजित पवारांचा गट भाजप सोबत आला तर त्यांना देखील चार जागा द्याव्या लागतील. असा प्रश्न भाजप मधल्या अनेक इच्छुकांना पडला आहे. या चार जागांमध्ये कुणा कुणाला घेणार असा प्रश्न आहे.

जर हा निकाल सरकारच्या बाजूने लागला तर सर्वच्या सर्व जागावर तात्काळ आमदारांची नियुक्ती करुन घ्यावी. मग कुणालाही प्रवेश द्यावा असा सुर व्यक्त होत आहे. गेले अनेक दिवस भाजपत प्रवेश घेऊन ना पद ना आमदारकी अशी अनेकांची अवस्था आहे. आता सुगीचे दिवस येतील अस असताना अजित पवार यांच्या बातम्यांनी अनेक इच्छुकांची झोप उडली आहे.

Tags

follow us