विजयानंतर दामलेंचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल शरद पवारांच्या भेटीला!
All India Marathi Theater Council Election 2023 : कोणत्याही राजकीय निवडणुकीत जितकी चुरस असते तितकीच चुसर यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) पंचवार्षिक निवडुकीत निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने बाजी मारली. तर प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्या आपलं पॅननला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. रंगकर्मी पॅननला 8 तर आपलं पॅननला फक्त 2 जागा मिळाल्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री श्री. उदय सामंत देखील… pic.twitter.com/3XyHhi2dtG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 21, 2023
त्यानंतर अभिनेते प्रशांत दामले यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदर केले जात आहे. यामध्ये दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत यांची देखील उपस्थिती होती.
याबाबत शरद पवार यांच्या ट्विटर हॅंडलवरून माहिती देण्यात आली की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री श्री. उदय सामंत देखील उपस्थित होते.
Prashant Damale : मराठी रंगभूमीसाठी भाग्याचा दिवस, प्रशांत दामलेंना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’
एखाद्या राजकीय निवडणुकी एवढं महत्व प्राप्त झालेली अ. भा. ना. परिषदेची निवडणूक 16 तारखेला पार पडली होती. या निवडणुकीत यंदा प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात थेट लढत होती. त्यामुळं सर्वांच लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडं लागलं होतं. मुंबई, ठाणे,सांगली, धुळे, सोलापूर, नगर, बीड, वाशीम आणि नागपूर या शाखांमध्ये मतदान पार पडले. तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, अमरावती व बेळगाव या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध झाली.
मुंबई मध्यवर्ती शाखेमध्ये दामले आणि कांबळी यांच्या रंगकर्मी आणि आपलं पॅनल हे दोन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात होते. या दोन पॅनलमध्ये ही निवडणुकअटीतटीची होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, निवडणुकीचे निकाल पाहता, ही निवडणुक एकतर्फीच झाली. असं म्हणावं लागेल. मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10 जागांवर रंगकर्मी नाटक समूह पॅनलचे 8 उमेदवार विजयी झाले. तर आपलं पॅनलच्या फक्त 2 उमेदार या निवडणुकीत विजयी झाले. रंगकर्मी पॅनलचे प्रशांद दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर, आणि वैजयंती आपटे विजयी झाले. रंगकर्मी नाटक समूहाने एकून 52 जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर आपलं पॅनलमधून प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने या दोघांचा विजय झाला आहे.