“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…” काँग्रेसमध्ये परतण्याच्या मुद्दयांवर सत्यजित तांबेचं सूचक ट्विट

“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…” असं सूचक ट्विट आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलं आहे. काल संगमनेर मध्ये परत आल्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित परत येतील, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यावर सत्यजित तांबे यांनी सूचक ट्विट केलं आहे. सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये ही कविता लिहली आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा […]

_LetsUpp

balasaheb thorat and satyajeet tambe

“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…” असं सूचक ट्विट आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलं आहे. काल संगमनेर मध्ये परत आल्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित परत येतील, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यावर सत्यजित तांबे यांनी सूचक ट्विट केलं आहे.

सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये ही कविता लिहली आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी । घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।

संगमनेरमध्ये बाळासाहेत थोरातांचे भव्य स्वागत झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी थोरात हे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याविषयी काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, यावेळी बोलतांना थोरात म्हणाले, ‘सत्यजित, तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही तुझ्या शिवाय करमणार नाही. त्यामुळे तू किती दिवस अपक्ष राहणार, हे आपण ठरवू,’ असे सांगत तांबे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे संकेतही थोरात यांनी दिले.

हेही वाचा :  बाळासाहेब थोरातांनी दिले सत्यजित तांबेंना काँग्रेसमध्ये परत येण्याचे संकेत

पण या ट्विटमुळे सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात सत्यजित तांबे नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version