Download App

Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन

त्नागिरी : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची उद्या 5 फेब्रुवारी रत्नागिरी तालुक्यातील खेडमध्ये सभा होणार आहे. यासाठी मराठी मुस्लिम सेवा संघ एकवटला आहे. कोकणातील मुस्लिमांनी या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करणारं थेट पत्रकच त्यांनी काढलं आहे. उद्धव ठाकरे हे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवणारे नेते असल्याचं या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

ज्यावेळी शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळीच कोकणातील मुस्लिम समाज भाजपपासून दूर जातोय तसेच आता हा समाज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देईल अशी चर्चा सुरू होती. आता हे मुस्लिम सेवा संघाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारं पत्रक काढल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होतंय की काय ? अशी देखील चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून टाकावी, राणेंचे फडणवीसांना पत्र

फकीर मोहम्मद ठाकून हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे आजच खेडमध्ये येणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेवर त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज या सभेला उपस्थित राहिल याचं नियोजन करण्यात येणार आहे. याच पत्रकामध्ये मुस्लिम सेवा संघाकडून म्हटलं गेलं आहे की, काही पक्ष पैसा आणि सत्तेच्या जोरावर देश गिळंकृत करायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे त्याविरोधात लढत असून आपण त्यांना साथ देणं गरजेचं आहे.

त्याचबरोबर बेरोजगारीसह देशातील चर्चेतील मुद्द्यांचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरेंच्या या सभेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोकण हा शिवसेनेचा पाया आहे. तसेच कोकणातील लोक नेहमीच बाळासाहेब ठाकरेंच्या मागे उभा राहिले आहे. तर आता या पत्रकामुळे कोकणातील मुस्लिम समाज या सभेला किती संख्येने उपस्थित राहतो याची उत्सुकता आहे.

Holi Wishes to Sanjay Raut : प्रविण दरेकरांकडून संजय राऊतांना होळीच्या खास शुभेच्छा! | LetsUpp

Tags

follow us