कालच भेटलो, जेवलो…गप्पा मारल्या विश्वासच बसत नाही; कर्डिलेंच्या निधनाने सुजय विखेंना धक्का…

विश्वासच बसत नाही, हा भाजपला मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे पाटलांनी आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निधनावर दिलीयं.

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil On Shivaji Kardile death : आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivjirao kardile) कालच माझ्याकडे जेवले आम्ही गप्पाही मारल्या, माझा अजूनही विश्वास बसत नाही, या शब्दांत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी कर्डिले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिलीयं. आज पहाटेच्या सुमारास कर्डिले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरलीयं.

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, काल लोणीत आमदार कर्डिले माझ्याकडे जेवले आम्ही गप्पाही मारल्या अजूनही विश्वास बसत नाही. एक नेतृत्व, आमचे संबंध संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून एकत्रितपणे काम करीत आहोत. अहिल्यानगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो. प्रत्येच चढ उतारामध्ये आम्ही एकसंघ राहिलो. त्यांच्या निधनामुळे भाजप महायुतीला मोठा धक्का बसल्याचं विखे यांनी सांगितलंय.

लेखिका आणि आशियातील पहिल्या महिला सिनेमॅटोग्राफर बी.आर. विजयालक्ष्मी यांचे सोनम कपूरकडून कौतुक

तसेच काही दिवसांपूर्वीच कर्डिले यांचं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं. दोन दिवसांपूर्वी ते रोज यायचं म्हणत होते. ते काल लोणीमध्ये आले होते. कालचा व्हिडिओ एकाने मला पाठवला सकाळी मी पाहिला. हे सगळंच अविश्वसनीय झालंय, मी शॉकमध्ये आहे, यातून बाहेर यायला वेळ लागेल. सकाळी कळाल्यानंतर मी धावपळीत इकडे आलो, असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

…’त्या’ प्रकरणात मला क्लिनचिट मिळाली; वडेट्टीवार यांच्या आरोपांना देवांग दवे यांनी काय दिलं उत्तर?

दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आली. कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. कर्डिले यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.

Exit mobile version