Former BJP MLA Jagdish Mulik vs Sunil Tingre : वडगाव शेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. कारण येथील बॅनरवरून मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गायब आहेत. त्यावरून आता महायुतीमध्येच शाब्दिक वार सुरू झाले आहेत. (MLA Jagdish Mulik) या कामात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं योगदान आहे. परंतु, त्यांचा फोटो टाकण्याच सौजन्यही दाखवल नाही असा सवाल माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला आहे.
वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड मिळालंच पाहिजे; जागावाटपाआधीच अंधारेंची काडी
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळतय. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का? असा सवाल माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला आहे. आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक संतापल्याचा पाहायला मिळालं आहे.
पुण्यात महायुतीत ठिणगी पडल्याचं समोर आलं आहे. महायुती म्हणून वडगाव शेरी येथे केवळ भाजप आणि शिवसेनेनेच
महायुतीचा धर्म पाळायचा का? असा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. #mahayuti #vadgaonsheri #jagdishmulik #pune pic.twitter.com/EHhFoz810Y— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 26, 2024
वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का?
महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे !
वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या… pic.twitter.com/CvcDhAkWXm
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) August 25, 2024