“वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड मिळालंच पाहिजे”; जागावाटपाआधीच अंधारेंची काडी

“वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड मिळालंच पाहिजे”; जागावाटपाआधीच अंधारेंची काडी

Sushma Andhare on Maharashtra Elections : राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपाची कुजबूज सुरू झाली आहे. जागावाटपावरून ओढाताण होणार हे नक्कीच. त्याचा प्रत्यय आतापासूनच यायला लागला आहे. पुण्यात आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्यात भाषणातच सुषमा अंंधारे यांनी मविआत अस्वस्थता निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे. यावेळी आमच्या काही जागा जाऊ नयेत. आमच्या काही जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजेत. पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर, कोथरूड या जागा आम्हालाच मिळायला हव्यात असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत मोठं विधान केलं. महाविकास आघाडीत अजून जागावाटप झालेलं नाही. चर्चाही सुरू झालेल्या नाहीत असं असतानाच त्यांनी आज पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर सरळ दावाच सांगून टाकला. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

देवेंद्र फडणवीस सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? वाझेंचा उल्लेख करत अंंधारेंचा हल्लाबोल

फडणवीस सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?

अंधारे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस जेव्हा अनिल देशमुख सातत्याने पत्रकार परिषदा घेत होते बरोबर त्याच वेळेत सचिन वाझे लेटर बॉम्ब टाकतो. कसं काय.. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुखांवर कारवाई झाली. पण या काळात माध्यमांशी बोलण्याचा त्यांना अधिकार नव्हता. मग हा स्कोप सचिन वाझेला कसा मिळू शकतो? इतके दिवस सचिन वाझे काय झोपी गेला होता का? सचिन वाझे म्हणतो मी फडणवीसांना पत्र लिहिलं पण फडणवीसांना पत्र लिहिण्याचा प्रश्नच कुठं येतो.

त्यामुळे फडणवीसच स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? कुणाला वेड्यात काढताय? अशा शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

‘देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल’ सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

फडणवीस कॉपी करून पास झालात का?

फडणवीस तुम्ही कॉपी करून पास झाला आहात का? आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होते हे तुम्ही म्हणाल? सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कोणतीही मर्यादा नव्हती. फडणवीस, महाराष्ट्रातील जनता डोक्याला गोडे तेल लावत नाही. धोतरावर शर्ट इन करत नाही. 70 वर्षात मोदी कुठेतरी चहा विकत होते. फडणवीस खोटे नरेटीव्ह देत आहेत. इथे सगळेच भाचे उपाशी फिरताहेत. दाजी मंडींना नोकऱ्या नाहीत आणि तुम्ही बहिणीला दीड हजार रुपये देत आहात? पहिले तुम्ही जुगार अड्डे, दारूचे अड्डे बंद करा. मग बहिणींची काळजी आहे असं सांगा.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube