Download App

बडा नेता अजितदादांच्या गळाला? माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रफुल्ल पटेलांची भेट

  • Written By: Last Updated:

Churchill Alemao : गोवा : माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (Churchill Alemao) यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आलेमाओ लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. आलेमाओ यांनी आतापर्यंत पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार आणि एकदा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यामुळे आलेमाओ यांच्या येण्याने महाराष्ट्र, मेघालयनंतर गोव्यातही ताकद वाढणार आहे.

बंडानंतर अजित पवार यांनी त्यांच्या गटाचा विस्तार सुरु केला असून सातत्याने इनकमिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच मेघालयमधील राष्ट्रवादीच्या सर्व सातही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर आता चर्चिल आलेमाओ यांनीही शुक्रवारी (18 ऑगस्ट) मुंबईत अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, या भेटीनंतर ते अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं.

आंबेगाव त्यांना नक्कीच धडा शिकवेल, हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर आव्हाडांची टीका

भेटीवर भाष्य करताना चर्चिल आलेमाओ म्हणाले, , मी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. मात्र, प्रत्येक भेट ही राजकीय असतेच असं नाही. ते फक्त राज्यसभेचे खासदारच नाहीत तर माझे चांगले मित्रही आहेत. राजकारणाव्यतिरिक्त आमचे वैयक्तिक संबंध आहेत, असं सांगितलं. तुम्ही भविष्यात राष्ट्रवादीत जाणार का? असे विचारलं असता ते म्हणाले, कोणत्या पक्षात जायचे हे मी अजून ठरवलेले नाही. याबाबत निर्णय होताच सविस्तर सांगेन. मी फक्त अजित पवारांनाच नाही तर शरद पवार, प्रफुल्ल पटेल अशा सर्वांना भेटेन, असंही त्यांनी स्पष्ट केले.

आलेमाओ यांची कारकीर्द

चर्चिल आलेमाओ हे गोव्यातील मोठं राजकीय प्रस्थ आहे. ते युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि सेव्ह गोवा फ्रंट या दोन पक्षांचे संस्थापक सदस्य होते. 1990 मध्ये ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. आलेमाओ हे आतापर्यंत पाच वेळा आमदार झाले आहेत. तर दक्षिण गोव्यातून दोन वेळा खासदार राहिले आहेत. 2017 मध्ये त्यांनी बेनौलीम मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली होती.

Tags

follow us