Download App

एकनाथ शिंदेंचं करमाळ्यात ऑपरेशन टायगर; माजी आमदार जयवंत जगतापांच्या हाती धनुष्यबाण

शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.

Eknath Shinde Shivsena : राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यापासून महायुतीत इनकमिंग सुरुच आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) तोंडावर पक्षप्रवेशाचा वेग वाढला आहे. शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर तर अगदी जोरात सुरू आहे. आता याच शिंदेसेनेनं आणखी एक बेरजेचं गणित केलं आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत जयवंत जगताप शिवसेनेत दाखल झाले.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. सध्या महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे आमदार जास्त आहेत. राजकीय ताकदही जास्त आहे. अशा परिस्थितीत भाजपसमोर टिकायचं असेल तर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही याची जाणीव एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना झाली आहे.

त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून पक्षप्रवेशाला आणखी विस्तार देण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंनी तर ठाकरे गट रिकामा करण्याचाच चंग बांधल्याचं दिसत आहे. एकामागोमाग एक शिवसैनिक, पदाधिकारी आणि माजी आमदार शिंदेसेनेत दाखल होत आहेत. आताही माजी आमदार जयवंत जगताप यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घडला. यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर उपस्थित होते.

पवारांचे दोन निष्ठावान शिलेदार प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत; पद कुणालाही मिळालं तरी, गणित फायद्याचचं

कोण आहेत जयवंत जगताप

जयवंतराव जगताप दोन वेळेला करमाळ्याचे आमदार होते. 1990 मध्ये अपक्ष तर सन 2004 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संजय शिंदे यांना विजयी करण्यात आणि त्यानंतर 2024 मध्ये नारायण पाटील यांना विजयी करण्यात जयवंत जगताप यांचा वाटा आहे. माजी आमदार जयवंत जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा आणि चुलते स्व. अण्णासाहेब जगताप एक वेळेला आमदार होते.

दरम्यान, आता जयवंत जगताप यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणित बदलणार आहेत. करमाळा तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला या राजकारणाचा मोठा फायदा होणार आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच करमाळ्यात भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. एकूणच एकनाथ शिंदे यांचं प्लॅनिंग जोरदार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

मी नितेशला समज दिली…’बाप’वरून वाद पेटला, नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान

follow us