पुढचे राजकारण Gen-Z भोवती फिरणार, संपर्क वाढवा; पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Raj Thackeray यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जेन झीशी संपर्क वाढवण्याच्या सूचना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Raj Thackeray

Raj Thackeray

Future politics will revolve around Gen-Z step up outreach Raj Thackerays instructs office-bearers meeting in Pune : पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सध्या राज्य आणि देशात सुरू असलेल्या जेन झी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरची स्थिती पाहता राजकारणावर त्यांचा परिणाम होत आहे. ही मूलं मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत किंवा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क वाढवण्याच्या सूचना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, Gen – z कडे फोकस करा त्यांच्याशी संपर्क वाढवा. कारण Gen – z मध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद आहे. ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात त्यामुळे त्यांच्याशी समरस व्हा. कारण पुढचे राजकारण Gen-Z भोवती फिरणार आहे. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

 

Exit mobile version