विखेंना धक्का! गणेश कारखाना थोरात-कोल्हेंनी हिसकावला…

Ganesh Sugar Factory Election : राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 19 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. आत्तापर्यंतच्या निकालावरुन राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखेंना (Sujay Vikhe)मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये 19 जागांपैकी 13 जागांवर थोरात-कोल्हेंच्या गटाने जिंकल्या […]

महाविकास आघाडीचे विवेक कोल्हेंना बळ ?; पण विखेंनी दराडेंना एक गठ्ठा मते देऊन गेम पलटवली !

Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat Vivek Kolhe

Ganesh Sugar Factory Election : राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 19 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. आत्तापर्यंतच्या निकालावरुन राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखेंना (Sujay Vikhe)मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये 19 जागांपैकी 13 जागांवर थोरात-कोल्हेंच्या गटाने जिंकल्या आहेत. या कारखान्यात आता सत्तांतर झालं आहे. हा कारखाना गेल्या दहा वर्षांपासून विखेंच्या ताब्यात होता. (ganesh-sugar-factory-election-thorat-kolhe-group-wins)

News Area India Survey : फडणवीसांचे लाडके अभिमन्यू पवार पराभवाच्या छायेत!

राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये लक्ष घातले आहे. त्यावरुन विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. बाजारसमितीच्या निवडणुकीत दोघांनी एकमेकांविरोधात पॅनल दिला होता, मात्र दोघांनीही आपापल्या सत्ता राखल्या.

News Area India Survey : श्रीकांत शिंदेंची फिल्डिंग फेल जाणार? प्रणिती शिंदे चौथ्यांदा गाठणार विधानसभा

विखे संगमनेरमध्ये हस्तक्षेप करत असल्याने थोरांतांनीही थेट गणेश कारखान्यावर लक्ष केंद्रीत केले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा मुलगा विवेक कोल्हे यांच्याबरोबर युती केली. त्यामुळे थोरात-कोल्हे पॅनल मजबूत झाला होता. त्यात राष्ट्रवादीचे संग्राम कोतेही थोरात यांच्याबरोबर होते.

विखेंविरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते, कोणत्याही परिस्थितीत कारखाना ताब्यात घेण्याचा चंग विरोधकांनी बांधला होता. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित काळे यांनीही नऊ ठिकाणी उमेदवार दिले होते त्याचाही विखेंना फायदा झाला नाही. हा कारखाना आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून विखे पिता-पुत्रांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहनही केले होते, मात्र त्याचा काहीही फायदा मतदानामध्ये झालेला दिसत नाही.

Exit mobile version